Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रॉ कॉ. शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टर मुरमांद्वारे खड्ड्यांना दिला मुलामा
    जळगाव

    रॉ कॉ. शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टर मुरमांद्वारे खड्ड्यांना दिला मुलामा

    By August 28, 2020No Comments70 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : शहरामध्ये अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे पलीकडचे गणित व सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची अजूनच नाचक्की झाली आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टर द्वारे मुख्य रस्त्यासह प्रभाग १८ मधील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्यांना मुलामा दिला आहे.

    शहरांमध्ये रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे कधी खड्ड्यांमध्ये नावे टाकून आंदोलन करण्यात येते तर कधी खड्ड्यांमुळे वेदनाशामक बाम देऊन पालिकेचे लक्ष वेधण्यात येते अशातच प्रभाग १८ मध्ये सततच्या पावसामुळे रस्त्याची नाचक्की झाल्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून तब्बल ३५ ट्रॅक्टर मुरमा द्वारे खड्ड्यांना मुलामा देण्याचा काम सुरू केले आहे, यामध्ये मुख्य जामनेर रस्ता, अष्टपुर मंदिर समोरचा काही भाग, सदानंद डेरी समोरचा काही भाग ,जुना तालुका पोलिस स्टेशनसमोर ,गंगाराम प्लॉट, पोस्ट ऑफिस ,राठोड बिल्डिंग,  श्रीराम गणेश मंडळ तसेच मित्र गणेश मंडळ या ठिकाणी मुरूम टाकण्याचे कार्य सुरू आहे.

    अमृत योजनेचे काम होइस्तव  शहरातील रस्ते पक्के करता येणार नाही असे शासनाचे निर्देश असल्याचे सांगण्यात येते मात्र सद्यस्थितीचे रस्ते अत्यंत खराब व  वेदनादायक असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरामध्ये फेरफटका मारल्यास नक्कीच कुठे ना कुठे खड्ड्यांमध्ये पाय गेल्याशिवाय राहत नाही अशातच पाठीचे, मणक्याचे व्याधी नागरिकांना जळत आहे ,हा काही नाविन्यपूर्ण विषय राहिलेला नाही यातच गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पावसाने रस्त्यांची अजूनच बिकट परिस्थिती केली आहे किमान आपल्या प्रभागात तरी लोकांना खड्ड्याचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने धांडे यांनी यांनी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे कार्य हाती घेतले आहे  पालिका प्रशासनाने  अमृत योजना पूर्ण होईल तो रस्ते न करण्याचे आदेशाचे पालन करावे मात्र तात्पुरत्या स्वरूपात लोकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने तरी रस्त्याची डागडुजी मुरूम टाकून मार्ग काढावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif