रेशन दुकानदाराची चौकशी करुन कारवाई करा – राष्ट्रवादीची मागणी

0

भुसावळ ;- येथील पंचशील नगरातल्या रेशन दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

या बाबतीत  तहसीलदारांना  निवेदन नमूद देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पंचशील नगरातील स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक ३९/०२चा संचालक शेखर पगारे हे अलीकडच्या काळात धान्य वाटप करत नाहीत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून या दुकानातून धान्य वाटप न झाल्यामुळे या दुकानाशी संलग्न असणार्या गोर-गरीब लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. या संदर्भात संबंधीत दुकानदाराची चौकशी करून त्वरीत धान्य वाटप सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याची दखल न घेतल्यास उपोषणासह आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यात देण्यात आलेला आहे. या निवेदनावर मुन्ना सोनवणे यांच्यासह इतरांच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.