पारोळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनांन्वये व अध्यक्ष जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार उपरोक्त प्रमाणे तालुका सार्वजनिक वितरण (रेशनिंग) कमिटी गठित करण्यात आली आहे.
त्यात पारोळा तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब हिलाल (पाटील) राजपूत यांची तर सचिवपदी संजय लटकन पाटील, व सदस्य म्हणून प्रमोद भिमसिंग पाटील, संजय समरथ बिऱ्हाडे, रामा कनीराम जाधव, कल्पना शालीक वानखेडे, शाहीद खा बेलदार, हिम्मत राजाराम पाटील, लक्ष्मण सुरेश ठाकरे, राजेश भगवान सरदार, रमेश त्र्यंबक पाटील, भीमराव श्रीराम शिंदे, यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनांन्वये अध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार उपरोक्त प्रमाणे तालुका सार्वजनिक वितरण( रेशनिंग) कमिटी गठित केली असून समिती सदस्यांनी covid-19 च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रारींचे निराकरण करावयाचे आहे त्याबाबत प्रशासन व नागरिक यांच्याशी समन्वय साधण्यात यावा संकटकाळी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे असून आपण सर्व सामान्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील याची खात्री आहे असे पत्र गुलाबराव पवार अध्यक्ष जिल्हा सार्वजनिक वितरण समिती यांच्या सहीने दिले आहे.