रेशनचा काळाबाजार ; जिल्ह्यातील 4 रेशन दुकानांवर छापे टाकून प्राधिकारपत्र रद्द

0

जळगाव :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने रेशन दुकानांवर पुरेसे धान्य उपलब्ध करून दिले आहे. तरी देखील काही ठिकाणी लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार धान्याचे वाटप होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच रेशन धान्य दुकानांवर अचानक छापे टाकण्याची मोहिम जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अादेशान्वये सुरू झाली आहे. आतापर्यंंत 4 रेशन धान्य दुकानांवर पुरवठा विभागासह इतर नेमलेल्या पथकाने छापे टाकून चार रेशन दुकानांचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे. यामुळे रेशन दुकानादारामध्ये खळबळ उडाली आहे.

लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य न देणे, अंत्याेदय लाभार्थींना साखर वाटप न करणे, धान्य घेतल्याची पावती न देणे आदी कारणांमुळे रेशन दुकानदारांवर ही कारवाई करण्यात येत आहे.  यात चिंचोली येथील संजय शालीग्राम घुले, एस.बी. लाेखंडे (कडू प्लॉट जूना सातारा, भुसावळ),  गुलाब हिलाल फुलझाडे (बांभोरी प्र.चा.,ता.धरणगाव) भुषण सुधाकर सूरवाडकर (साळीबाग, ता.रावेर) या चार रेशन दुकानदारांचे प्राधिकारपत्र रद्द झाले आहे..

लॉकडाऊन असल्याने केंद्र व राज्य शासनाने रेशन दुकानांवर पुरेसे धान्य उपलब्ध करून दिले आहे. 5 किलो तांदूळ मोफत मिळत आहे. सोबत नियमीत धान्यही वाटप करण्याच्या सूचना आहे. मात्र रेशनचे धान्य वाटप करताना लाभार्थ्यांचे ‘थम’घेवू नये अशा सूचना आहे. रेशन दूकानदारांनी स्वतःच थम ई-पॉस मशिनवर देवून धान्य वाटप करावे अशा सूचना आहे. हीच बाब संधी समजून रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या वाट्यावर असलेले धान्य देत नाही. एका कार्डावर पाच सदस्य असतील तर दोन किंवा तीन तीन सदस्यांच्या हिश्‍याचेच धान्य देतात. इतर सदस्यांचे धान्य वरूनच आले नाही, त्याला काय करणार ? हवे असेल तर घ्या. असे प्रकार सर्रास सूरू आहे. सदस्यांच्या हिश्‍यांचे उरलेले धान्य काळाबाजारात विकले नेत असल्याचे प्रकार राजरोसपणे घडतात.दरम्यान, काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची पथके नेमून रेशन दूकानांची अचानक तपासणी करण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.