रेशनकार्ड धारकांनी आधार लिकींग करून घ्यावे – तडवी 

0
परवानाधारक रेशनदुकानदारांसाठी तहसिल कार्यालयातर्फे कार्यशाळा उत्साहात 
जळगाव, दि.8 –
शासनाने इपिडीएस प्रणाली मार्फत रेशनकार्डधारकांना धान्य पुरवठा करण्यात येत होता. मात्र आता 1 मे पासून एईपिडीएस प्रणालीने अर्थात रेशनकार्डला आधारकार्ड लिकींगद्वारे लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधारलिकींग करून लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलचे पुरवठा निरीक्षक के.आर.तडवी यांनी आज परवानाधारक रेशनदुकानदार यांच्यासोबत झालेल्या कार्यशाळेत बोलतांना केले.
तहसिल कार्यालयाजवळील पत्रकार भवनात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुरवठा तपासणी अधिकारी डी.एस.पुसकर, पुरवठा निरिक्षक ए.आर.जाधव, किशोर ठाकरे, सहारे मॅडम आदींनी मार्गदर्शन केले. तसेच रेशनदुकानदार संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटीया यांच्यासह तालुक्यातील 60 परवानाधारक रेशनदुकानदार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना तडवी म्हणाले की, अनेक वेळा आधारकार्ड लिकींगसाठी कुटूंबातील दोन सदस्यांचा अंगठ्याद्वारे लिकींग झाल्यानंतर उर्वरीत सदस्यांनाही आधारलिकींग तात्काळ करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा कुणीही वंचित राहू नये. अशा सुचना घेण्यात आल्या. या कार्यशाळेत प्रत्येक रेशनदुकानदार व तेथील एक लाभार्थी यांना लिकींगचे प्रशिक्षण देण्यात येवून सुचना करण्यात आल्या. कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.