रेल प्रशासनातर्फे विशेष पार्सल गाड्‍यांमध्ये वाढ !

0

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोनाचा दुष्प्रभाव व लॉकडाऊन मुळे आवश्यक साधन सामग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवण्‍यात येणार आहे . ज्या लोकांना काही सामग्री पाठवयाची असेल त्यांनी जवळच्या स्थानकावर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकड़े संपर्क करावा मागणी नुसार गाड़ीची फेरी वाढविण्यात येणार आहे.

पोरबंदर-शालीमार विशेष पार्सल गाड़ी ( ४फेरी )क्र.००९१३ डाउन  ही दि.२६,२८,३० एप्रिल व २ मे रोजी पोरबंदर स्थानकावरून सकाळी ८ वाजता सुटून तिस-या दिवशी रात्री १-३० वाजता शालीमार स्थानकावर पोहचेल .

गाड़ी क्र.००९१४ अप शालीमार-पोरबंदर विशेष पार्सल गाड़ी ही दि.२८,३० एप्रिल व २ आणि ४ मे रोजी शालीमार स्थानकावरून १०-५० वाजता सुटून तिस-या दिवशी ६-२५ वाजता पोरबंदर येथे पोहचेल .

या गाडीला डाउन दिशेत  भुसावळ,अकोला,बडनेरा, नागपुर,दुर्ग,रायपुर,बिलासपुर या स्‍थानकांवर थांबा राहील तर अप दिशेने बडनेरा,अकोला,भुसावळ,नंदुरबार,सूरत,वरोदरा,आनंद, अहमदाबाद,सुरेन्द्र नगर , राजकोट,जामनगर या स्‍थानकांवर थांबा राहणार असल्‍याचे भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.