लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर
शहरात सध्या करोना रुग्ण संख्या वाढत अशातच राज्य परराज्यातून येणाऱ्या असंख्ये प्रवाशांची रेल्वेस्थानकावर तपासणी न करताच शेकडोंच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर व आत जाण्यासाठी सध्या दोन मार्ग असल्यामुळे दुसऱ्या मार्गाने राज्य परराज्यातून येणारे प्रवासी शहरात प्रवेश करत आहेत. रेल्वे स्थानकावर बऱ्याच नागरिकांच्या देखील चेहऱ्यावर मास्क देखील नसते, यामुळे रेल्वे स्थानकावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाचे मात्र या गंभीर गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, सध्या राज्यातल्या राज्यात शासनाने तपासणी बंधनकारक केलेली नसली तरी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे रेल्वेस्थानकावर बंधनकारक आहेत. सध्या रेल्वे स्थानकाबाहेर व आत जाण्यासाठी दोन गेट करण्यात आले आहेत. या आधी रेल्वे स्थानकात केवळ एकाच गेटने एन्ट्री व एक्झिट होती. मात्र, आता या दुसऱ्या गेटने परराज्यातील शेकडो प्रवासी रोज विनातपासणी रेल्वे स्टेशन बाहेर येत आहे.
या गंभीर गोष्टीचे नगर पालिकेला अजिबात गांभीर्य नाही. त्यात दुसऱ्या मार्गे हजारोंच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर विनातपासणी येत आहे. यातून मोठ्या प्रमाणावर आजार फोफावण्याची भीती निर्माण झालेली आहे.