रेल्वे स्काऊट गाईड कॅम्प आणि योगा शिबिराचे उदघाटन संपन्न

0

भुसावळ | प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावर स्काऊट गाईड कैम्प आणि  योगा शिबिराचे आज उदघाटन  राष्ट्रीय स्तरावर योगा शिबिराचे आज उदघाटन आज दिनांक 20 जून 2019 रोजी भुसावळ मंडळाचे विभागीय  रेल्वे  प्रबंधक  आर के यादव यांच्या हस्ते करण्यात आले.  तत्पूर्वी भारत स्काऊट आणि गाईड चे ध्वजारोहण करण्यात आले उदघाटन प्रसंगी मंडळ रेल्वे  प्रबधंक आणि संरक्षक  आर के यादव यांनी उपस्तिथ स्काऊट गाईड यांना मार्गदर्शन केले  केले.
शारीरिक आणि मानसिक प्रसन्नतेसाठी योग प्राणायम आपल्या नित्यच्या  दिनचर्चेत सहभागी करण्याची गरज गरज असल्याचे त्यानी सांगितले .योग एक जीवन पद्धती नसून शरीर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी उत्तम असल्याचे त्यानी सांगितले .भारत  स्काऊट गाईडच्या मुख्यालयाने भुसावळ मंडळाला विश्व योगा दिन आणि तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्याची संधि दिली यासाठी त्यांनी भारत स्काऊट आणि गाईडच्या मुख्यालयाचे आभार मानले शारीरिक आणि मानसिक प्रसन्नतेसाठी योग प्राणायम दिनचर्चेत सहभागी  करा.
याप्रसंगी जिल्हा मुख्य आयुक्त आणि अप्पर मंडळ रेल्वे  प्रबधंक  मनोज सिन्हा ,जिल्हा आयुक्त (स्काऊट) आणि वरिष्ट कार्मिक अधिकारी  एन डी गांगुर्डे ,वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबधंक  आर के शर्मा ,वरिष्ट मंडळ अभियंता एम् बी तोमर ,वरिष्ट मंडल यांत्रिक अभियंता लक्ष्मी नारायण , वरिष्ट मंडल गृह आणि पर्यावरण प्रबधंक  रामचंदन,मुख्य चिकित्सा अधिकारी श्री पी सामंतराय ,सर्व सहाय्यक अधिकारी ,राजभाषा अधिकारी ,सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे अधिकारी ,विदयुत विभागाचे अधिकारी ,आणि सर्व अधिकारी उपस्तिथ होते. या शिबिरात राष्ट्रीय मुख्यालयातुन क्षेत्रीय संगठन आयुक्त (स्काऊट)  अनेश कुमार ,मध्य रेल्वेच्या मुख्यालयातुन राज्य संगठन आयुक्त (स्काऊट –गाईड )  मनोज नायर ,श्रीमती विद्या वाय,तसेच राज्य प्रशिक्षण  आयुक्त रवि कनोजिया यांचे यशस्वीतेसाठी  परिश्रम घेत  आहे .डॉ हरिनारायण त्रिपाठी हे मध्य प्रदेश येथून टार मधुमाला कौशल या छत्तीसगढ़ येथून योगासनाचे महत्व आणि प्रात्येक्षिक करुन दाखविले.या शिबिरात महाराष्ट्र ,गुजरात,राजस्थान ,मध्य प्रदेश ,छत्तीसगढ़ मध्य रेलवे ,उत्तर पश्चिम रेलवे ,पश्चिम रेलवे , स्काऊट- गाईड या राष्ट्रीय स्तराच्या स्काऊट गाईड शिबिरात 200 विद्यार्थी  सहभागी झाले आहेत. योग शिबिरात अधिकार्र्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि योगसनासवर आधारित पोस्टर मेकिंग प्रतियोगिता घेण्यात आली .त्यात स्काऊट आणि गाईडस यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. उद्या दिनांक 21  रोजी सकाळी रेल्वे स्कूल च्या मैदानावर विश्व योगा दिनानिमित्त योग प्राणायम शिबिर सकाळी ६.३० वाजेला आयोजित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.