जळगाव :- भादली-जळगाव दरम्यानच्या रेल्वे लाईनजवळ एका परप्रांतियाचा मृतदेह वृक्षाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर येथील राजू माडु काकडे (वय ४१)हे कामानिमित्त जळगाव येथे मोलमजुरी करण्यासाठी तरसोद येथे पत्नी व मुलासह राहत होता. आज सकाळी भादली-जळगाव रेल्वे लाईन दरम्यान असलेल्या एका वृक्षाखाली राजू काकडे यांचा मृतदेह आढळून आला. सकाळी गावातील कुलदीप पवार यांच्या नजरेस त्याचा मृतदेह पडल्याने त्यांनी तातडीने नशिराबाद पोलीस स्थानकात त्याबाबत माहिती कळवली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व भाऊ असा परिवार आहे. गावातील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.