विविध मागण्यांचे निवेदन सादर
भुसावळ (प्रतिनिधी)- रेलवे बोर्ड नवी दिल्ली चे विद्युत विभागाचे अतिरिक्त सदस्या श्रीमती मंजू गुप्ता यांनी भुसावळ येथील पि ओ एच वर्कशॉप ची शुक्रवार 31 रोजी पाहणी केली . यावेळी सर्वप्रथम सेंट्रल रेलवे मजदूर संघ पी ओ एच शाखे तर्फे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच रेलवे बोर्ड विद्युत विभागाचे अतिरिक्त सदस्य श्रीमती मंजू गुप्ता यांना सी आर एम एस. पी ओ एच शाखे तर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
निवेदनात प्रामुख्याने पी ओ एच वर्कशाप मधील दीर्घकाळापासून रिक्त असलेली पदे त्वरित भरन्यात यावेत, तसेच वाढत्या वर्कलोडसाठी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पदसंख्या वाढविण्यात यावी , प्रतिवर्ष लोको इंजिनची ओव्हरलिंग करण्याची संख्या वाढत आहे त्याच प्रमाणात वर्कशाप च्या जागेचेही विस्तारीकरण करण्यात यावे, इत्यादि मागण्यां नमूद केल्या आहेत . याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली या वेळी मुख्य कारखाना व्यवस्थापक शिव राम हे सुद्धा उपस्थित होते तसेच विद्युत विभागाचे अतिरिक्त सदस्या श्रीमती मंजू गुप्ता यांनी सुद्धा सर्व मुद्दयांवर सकारात्मक प्रतिसाद देवून सर्व समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
सीआरएमएसपीओएच शाखेतर्फे विभागीय सचिव पी.एन.नारखेड़े, शाखा सचिव डी.यु इंगले, मिडिया प्रभारी मेघराज तल्लारे, ईश्वर बाविस्कर, विकास सोनवणे, फारूक खान, राजेश सोनी, संदीप येवले, हरिचंद सरोदे, ताराचंद बह्राटे, योगेश पाटिल, सन्देश इंगले, प्रशांत कमलजा, कुणाल बोंडे, स्वप्निल भंगाले, अल्ताफ खान, प्रमोद बाविस्कर इत्यादि पदाधिकारी चर्चे वेळी उपस्थित होते.