रेल्वे तिकिटांचा काळाबाजार ; अकोल्याचा इसमाला पकडले

0

भुसावळ : भुसावळ  विभागातील अकोला रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रात काळ्याबाजारात विक्रीसाठी तिकिटे घेणार्या एका दलालास  येथील रेल्वे तिकीट तपासणीस पथकासह आरपीएफ कर्मचार्यांनी सापळा रचून अटक केली.

प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीवरून येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. शर्मा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुणकुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे तिकीट तपासणी एटीएस पथकाचे मुख्य तिकिट निरीक्षक ए.एस.राजपूत, टीटीआय प्रशांत ठाकूर, अकोला आरपीएफ विभागाचे एएसआय डी.के.पाल यांनी गुरुवारी  पावणेदहा ते सव्वा अकरा वाजेपर्यंत अकोला रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर सापळा रचला. यावेळी अकोला शहरातील जठारपेठ भागातील रमेशकुमार गांधीभाई बोरा (64) हा संशयास्पद अवस्थेत वावरताना आढळल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या अंगझडतीत अकोला ते पुणे जाण्यासाठी दोन वातानुकूलित श्रेणीचे तिकीट, एक व्दितीय शयनयान श्रेणीचे तिकीट मिळून पाच हजार 950 रुपये किमतीचे तीन तिकीट व आरक्षण तिकीटाचा कोरा फार्म जप्त करण्यात आला. प्रत्येकी तिकीटामागे 100 ते 200 रुपये कमिशनपोटी आपल्याला मिळत असल्यानेच हे काम आपण करीत असल्याची कबुली त्याने दिली. रमेशकुमार यास अटक करून अकोला आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.