Saturday, October 1, 2022

रेल्वे ट्रॅकमनच्या सामानाची पिशवी लंपास

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

- Advertisement -

रेल्वे ट्रॅकमनची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

श्याम नेत्राम परदेशी (वय ५६,  रा. हरीविठ्ठल नगर जळगाव) हे रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी त्यांची ड्यटी मोहाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर होती. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास ते मोहाडी शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ४१२/८ जवळून जात असतांना  त्यांनी त्यांच्याजवळील रेल्वेच्या मालकीची पिशवी मोकळ्या जागी ठेवून जवळील शेतात पाणी पिण्यासाठी गेले.

तर अज्ञात चोरट्‌यांनी त्यांची पिशवी लंपास केली.  याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या