Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रेल्वे ईसीसी सोसायटीवर आजही एनआरएमयुचेच वर्चस्व
    जळगाव

    रेल्वे ईसीसी सोसायटीवर आजही एनआरएमयुचेच वर्चस्व

    By June 29, 2019No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निकालानंतर पदाधिकार्यांचा जल्लोष ; 27 तास मतमोजणी

    भुसावळ :- आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र व सुमारे 300 कोटींची उलाढाला असलेल्या ईसीसी सोसायटी अर्थात रेल्वेच्या दि. सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को – आँपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.वर पुन्हा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने 35 पैकी 30 जागांवर विजय मिळविला. निकालानंतर पदाधिकार्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला तर सुमारे 27 तास मतमोजणी चालली. सोसायटीसाठी बुधवारी निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. दरम्यान, बडनेरा येथे संतोष भटकर (एनआरएमयु) व राजेश नांदूरकर (सीआरएमएस) या दोन्ही जणांना समान 278-278 मते मिळाल्याने याबाबतचा निर्णय मुंबई येथे घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

    शहरातील विजयी उमेदवार – 

    भुसावळातील उमेदवारांमध्ये अरुण भास्कर धांडे, प्रकाश प्रेमचंद बेंडाळे, रवींद्र पंडीत भालेराव, विशाल निवृत्ती सपकाळे, राजेंद्र सीताराम साळुंके, शशीकांत दगडू मकासरे, लेखराजसिंह पी.राजपूत, वाल्मीक गंगाराम देहाडे, ललित रघुनाथ भारंबे, दीपक चेदर कागडा, अरविंद तुकाराम खंबायत, ओमपालसिंह तेजपालसिंह, रवींद्र काशीराम चौधरी, राजेंद्र रखमाजी निकम आणि पल्लवी सुनील अंबाडे हे शुक्रवारी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. गुरूवारी सायंकाळी सुनील शेलार, कुंद महापात्रा, उमेश शेलार (नाशिक), अंबादास निकम, विलास मुलमुले, परवीन अहिरे, नितीन पवार (सीआरएमएस) (मनमाड), मिलींद खेडकर (नांदगाव), पुरूषोत्तम सोनवणे (सीआरएमएस, चाळीसगाव), प्रकाश जाधव (ट्रॅकमन असोशिएशन, पाचोरा), कुंदन जावळे, कीशोर कोलते (सीआरएमएस. पीओएच), पुपेद्र कापडे, देवांनद रजक, योगेश गुप्ता (खंडवा), संतोष चौधरी, संदेश पहूरकर, मोहंमद जहीर महंमद (अकोला) विजयी झाले. वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहायक म्हणून संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत रायमळे यांनी काम पाहिले . मंडळ कार्मिक अधिकारी एम.के. गायकवाड, सहायक कार्मिक अधिकारी राजेद्र परदेशी, एस.बी. रामटेके, विरेंद्र वडनेरे यांचे सहकार्य लाभले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif