रेल्वेत मोबाईल चोरी; सुरतसह अकोल्याचा आरोपी जाळ्यात

0

भुसावळ – रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेत रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लांबवणार्या सुरतसह अकोला येथील आरोपीच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तक्रारदार तेजस रवींद्रसिंग राजपूत (मलकापूर) हे 18 ऑक्टोंबर 2019 रोजी सुरत पॅसेंजरने जळगाव-मलकापूर प्रवास करीत असताना त्यांचा 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता.

या प्रकरणी श्रीकृष्ण बळीराम गाडगे (40, अकोला) यास 24 रोजी अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून राजपूत यांच्या मोबाईलसह अन्य एक 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. दुसर्या घटनेत शेख नदीम शेख खलील (30, जाम मोहल्ला, भुसावळ) या बिर्याणी विक्रेत्यासह अन्य एका ग्राहकाचा 18 हजार 350 रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना 24 जानेवारीला भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर रोजी घडली होती. या प्रकरणी शेख सलमान शेख सलीम (19, बापू नगर, सुरत) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे एएसआय व्यवहारे, विनोद कुशवाह, सोळंके तसेच लोहमार्गचे शैलेंद्र पाटील व जगदीश ठाकूर आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.