भुसावळ | प्रतिनिधी
रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन अदालत डीआरएम कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. निवृत्त कर्मचार्यांना मोबाईलवर संपर्क करून ई-मेलद्वारे तक्रारी सोडवल्या जातील. निवृत्तांनी तक्रारींचा अर्ज वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकार्यांना ई मेलद्वारे सादर करावे. त्यात आपले नाव, पदनाम, भरती तारीख, तक्रारीचे स्वरूप आदी नमूद करावे. अर्जासोबत पासबूक, आधारची झेरॉक्स प्रत पीडीएफ फाईलमध्ये पाठवावी. ३१ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.