पाचोरा आर. पी. एफ. ची कारवाई
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा ते परधाडे रेल्वे लाइन दरम्यान रेल्लेचे लोखंड चोरी झाल्याची गुप्त माहिती पाचोरा येथील आर. पी. एफ. जवानांना मिळाल्याने जवानांनी साफळा रचून कासोदा येथील चोरट्यास पकडून त्यांचेकडून १ हजार ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन पाचोरा रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा येथील आर. पी. एफ.चे हवालदार संदिप पाटील यांना कासोदा येथील शेख मजीद शेख नबी याने पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे रुळाचे लोखंड चोरी केल्याची माहिती मिळाली होती. संदिप पाटील यांनी भुसावळ येथील आर. पी. एफ.चे मंडळ निरीक्षक अजय दिवे, जळगाव येथील आर. पी. एफ.चे निरीक्षक महेंद्र मालशिंग, यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील ए. एस. तडवी, जयश महाजन, पी. व्ही. दुशी यांनी सापळा रचून कासोदा ता. एरंडोल येथील तळाई रोडवरील भंगार दुकानदार तथा संशयीत आरोपी शेख मजीद शेख नबी यास पोलीसी खाक्या दाखवून त्याचे कडून २८ चॅब्या, १७ लायनर व ०८ नटबोल्ट असा १ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेतले.