Sunday, May 29, 2022

रेल्वेची मोठी भरती ! परीक्षेविना होणार निवड; असा करा अर्ज

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे.

- Advertisement -

१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस करण्याची मोठी संधी आहे. २००० हून अधिक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

कमीतकमी ५० टक्के मार्कांसह १० वी पास झालेला असाल तर नोकरीची संधी आहे. संबंधीत ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआय पास झालेले असायला हवे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया १७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रेल्वे भरती २०२२ ची आवश्यक माहिती आणि नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे.

मुंबई क्लस्टर – 1659 पदे
भुसावल क्लस्टर – 418 पदे
पुणे क्लस्टर – 152 पदे
नागपुर क्लस्टर – 114 पदे
सोलापुर क्लस्टर – 79 पदे
एकूण पदांची संख्या – 2422 पदे

अॅप्रेंटीस पदासाठी योग्य उमेदवाराची निवड परीक्षेविना होणार आहे. यासाठी १०वी चे मार्क आणि आयटीआय मार्कांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. यानंतर क्लस्टरनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क…
सामान्य, ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या