पाचोरा – शहरातील बस स्टँड रोड वरील मानसिंगका ईंडस्ट्रीज समोरील व्यापारी संकुलातील रेडीमेड दुकानाला अचानक लागलेल्या आगीत सुमारे 8 ते १0 लाखांचे नुकसान झाले.
बस स्टँड च्या रस्त्यांवर असलेले उत्सव फॅशन सेंटर या रेडीमेड वस्त्राच्या दि.२२ रोजी दुकानाला रात्री १० वाजे सुमारास दुकानाच्या तळ घरात शाॅक सर्कीटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे फर्नीचर सह १० ते १२ लाखांचे नुकसान झाले. यात रेडीमेड कापड, ड्रेस मटेरिअल, इलेक्ट्रिक वस्तु, काम्प्यूटर संच, सी.सी.टी.व्ही. सह अन्य सामान जळून खाक झाला. यावेळी आजु बाजुची काही दुकाने चालु होती. उत्सव फॅशनचा दुकानातुन धुर निघत असल्याचे पाहुन दुकान मालक कृष्णा साळुंखे यांना माहिती कळवण्यात आले. त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली. या दरम्यान अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दुकानाचे शटर उघडताच आग विझविण्यासाठी न.पा.अग्नीशमन दलाच्या दत्तात्रय पाटील, राजेश कंडारे, भिकन गायकवाड,युसुफ पठाण पाटील कर्मचार्यासह साळुंखे यांच्या मित्र परिवारासह माजी नगरसेवक प्रदीप पाटील, जयेश कोटेचा, कुलदीप राऊत, दत्ता बोरसे पाटील, सुरज वाघ, मिलींद सोनवणे, धनराज पाटील, गोपाल पटवारी, संभा पाटील, भुषण पेंढारकर, अमोल वाघ, आजु बाजुचा दुकानदारांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.