भुलाबाई महोत्सवातून युवावर्गाला पारंपारिक संस्कृती व संस्कारांची माहिती; सखी श्रावणी महिला संस्थेतर्फे भुलाबाई महोत्सव साजरा
भुसावळ प्रतिनिधी
रूढि परंपरा तसेच चालीरितीचे संगोपन पुढील पिढीने सुद्धा करावे , आजच्या सोशल मीडिया इंटरनेट च्या विळख्यात अडकलेल्या युवावर्गाला पारंपारिक संस्कृती व संस्कारांचा विसर पडला असून अश्या कार्यक्रमांमुळे
रूढि व परंपरांची माहिती होईल असे प्रतिपादन डॉ.सौ वंदना वाघचौरे यांनी येथे आयोजित भुलाबाई महोत्सवात केले .
.कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुसावळ येथे सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे भुलाबाई महोत्सव 13 रोजी रविवारी उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ वंदना वाघचौरे या होत्या तर , प्रमुख पाहुण्या म्हणून परीक्षक सौ भारती राठी, योग शिक्षिका महानंदा पाटील , पत्रकार उज्वला बागुल, सौ.प्रभाताई पाटील, संस्थाध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून तसेच दिपप्रज्वलन व गणपती आणि भुलोबा व भुलाबाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भुलाबाई महोत्सवास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा झाडे लावा झाडे जगवा ही थीम राबविण्यात आली व पाहुण्यांना, विजयी स्पर्धकांना विविध फुलांची व शोभिवंत झाडांची रोपे व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकांत सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांनी भुलाबाई महोत्सवाचे उद्दिष्ट व संस्थेच्या कार्याचा आढावा, कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी भुलाबाई महोत्सवात सहभागी व विजेत्यांना शुभेच्छा आपल्या मनोगतातून देत आयोजकांचेही भरभरून कौतुक केले.
बाल नृत्यांगना नुपूर भालेराव हिनं नृत्याविष्कार सादर करून रसिकांची दाद मिळवली. तर नयना कळसकर हिने मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. भुलाबाई महोत्सवात, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, पाणीपुरी, सॅनेटरी नॅपकिन, दाबेली, कापडी पिशव्या आदी विविध वस्तूंची तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटण्यात आली होती. दरम्यान भुलाबाई महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये
रांगोळी स्पर्धा प्रथम कोमल गायकवाड, द्वितिय संजना इंगळे, तृतिय किर्ती चौधरी, नाश्ता प्लेट तयार करणे प्रथम मोहिता चौधरी, द्वितीय योगिता चौधरी पुजेची थाळी सजवणे प्रथम मोहिता चौधरी, द्वितीय अंकिता राणे फॉन्सी ड्रेस स्पर्धा भुलाबाई-भुलोजी प्रथम किमया भंडारी, द्वितीय पार्थ चौधरी. भुलाबाईची पारंपरिक गित व नृत्य स्पर्धा प्रथम शनि मंदिर वार्ड गृप व द्वितीय अहिर सुवर्णकार महिला मंडळ, भुसावळ यांनी पारितोषिक पटकाविले .
स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक शिल्ड, प्रमाणपत्र व रोप तसेच भुलाबाईच्या गाण्यांचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून सौ. भारती राठी यांनी काम पाहिले. भुलाबाई महोत्सवात आकर्षक मनमोहक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. याप्रसंगी विविध क्षेत्रातील महिलांच्या संस्थांनी महोत्सवास सदिच्छा भेट देऊन व विविध स्टॉल लावून सहभाग नोंदवला होता. महोत्सवात उपस्थित प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला होता. या लकी ड्रॉ च्या प्रथम मानकरी सौ. मालिनी माहूरकर या ठरल्या व विशेष पैठणी साडीचा मान पटकावला. तर दूसरा क्रमांक इंदिरा चौधरी व तृतीय मानसी नेवे हिने मिळवला.
सुत्रसंचालन सौ. अंजली नेवे व सौ. प्रतिभा विसपुते यांनी केले तर आभार सौ. कामिनी नेवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राजेश्री नेवे, कामिनी नेवे, उज्वला बागुल, माया चौधरी, भाग्यश्री नेवे, अनुराधा टाक, मंदाकिनी केदारे, वंदना झांबरे, श्रध्दा नेवे, पुजा नेवे, मनिषा कुलकर्णी, कल्पना दामले, सरिता चौक, आणी सर्व संस्था पदाधिकारी व सदस्या तसेच स्वररागिणी ढोल पथक चे सदस्य रोहन पाटील, आराधना टाक, उत्कर्षा गुरव, सोनु, भावेश फेगडे, निलिमा चौधरी व अॅड. जास्वंदि भंडारी यांनी परिश्रम घेतले.