मुंबई : ‘कोरोना’ संकटामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्याच्या मार्गावर आहे. रेड झोन वगळता सध्या महाराष्ट्रात 57 हजार 745 उद्योगांना परवाने मिळाले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. त्याविषयी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती दिली. राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरु झाले असून सहा लाख कामगार रुजू झाल्याचे त्यांनी सांगितली आहे.
रेड झोन वगळता सध्या राज्यात 57,745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी 5774 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये आज उद्योगमंत्री सुभाष देसाई ही माहिती दिली.
स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
राज्यातील लघु उद्योगांना सावण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय राज्य शासन लघु उद्योगांना इतर सुविधा पुरवण्याबाबत धोरण ठरवत आहे, असेही त्यांनी सांगितले.