रुईखेडा वनविभागाच्या अंतर्गत टेकड्यांवर स्वयंसेवकांचे महा श्रमदान

0

मुक्ताईनगर : रुईखेडा वनविभागाच्या अंतर्गत टेकड्यांवर जवळपास सव्वाशे खड्ड्यांचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मुक्ताईनगर तालुक्यातील विविध समाजसेवी संघटना ज्यात सिव्हिल सोसायटी, रुई खेडा ग्रामस्थ, ओम साई सेवा फाउंडेशन, वंदे मातरम ग्रुप, रेनबो ग्रुप, प्रवास ग्रुप, जय भवानी यूथ फाउंडेशन, राम रहीम, सेवाभावी संस्था, नवकार जैन संघटना, गायत्री परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ, शासकीय निमशासकीय कर्मचारी व परिसरातील सेवाभावी संस्था, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, वनविभाग ,पोलीस खाते ,संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे एनएसएस विभागाचे विद्यार्थी ,जिल्हा उप रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तसेच महिला कर्मचारी,रुईखेडा येथील ग्रामस्थ व महिला, मुक्ताईनगर येथील ग्रामस्थ महिला, डॉक्टर महिला व डॉक्टर, वकील, विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पंचायत समिती सभापती, मुक्ताईनगरचे नगरसेवक, विद्यार्थी, वृद्ध यांच्यासह जवळपास पाचशे स्वयंसेवकांनी महा श्रमदान करत लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन ही फार मोठी संघटना नामवंतांची आहे ,मात्र मुक्ताईनगर सिविल सोसायटी ने देखील तसाच आदर्श पायंडा पुढे चालवला आहे. वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या टेकड्या व धरण परिसरात केलेले हे खड्डे केवळ महाश्रमदान नसून भविष्य त सामाजिक जाणिवेची एक फार मोठी नांदी नक्कीच राहील. जीवनात आपण स्वतःसाठी खूप जगतो मात्र समाजासाठी देखील आपलं काही देणं लागतो हे या विविध समाजसेवी संघटना व उपस्थित मान्यवरांनी दर्शन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.