सातारा : कोरोना विषाणूने मागील ४ दिवसांत महाराष्ट्रात आपले पाय पसरले आहेत. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा ६०० च्या वर गेला असताना आता काही जिल्ह्यांतून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. साताऱ्यात कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. १४ दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
याच रुग्णाचे कालच्या फेरतपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या साताऱ्यातील रुग्णांची संख्या आता पुन्हा ३ झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.