भडगाव-
येथे श्री नारायण मंगल कार्यालय येथे दुपारी 2 वाजता रिपाई चे तालुका अध्यक्ष एस. डी.खेडकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा पाचोरा न. पा.चे माजी गटनेते अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच तालुका मेळावा सम्पन्न झाला. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरूवात झाली मेळाव्यात तालुका अध्यक्ष एस डी खेडकर, प्रल्हाद बाविस्कर, वाल्मिक लोखंडे यांनी आपआपले विचार मांडले शेवटी अध्यक्षीय समारोप प्रसंगी अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले रिपाई हा महामानव डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या संकल्पनेतला पक्ष असून रिपाई नेहमी अन्यायाच्या बाजून उभे राहून न्याय व हक्क साठी दिन दलित कस्टकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहिला आहे त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करून लोकसभेचा उमेदवार निवडुन आणण्याचे आवाहन केले व भाजप शिवसेना, ,रिपाई,रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवारा बाबत कोणतेही मतभेद न करता रिपाई कार्यकर्त्यांचा मानसन्मान केला जाईल असे सांगितले या वेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते झिपा आपा केदार,प्रल्हाद बाविस्कर,युवा अध्यक्ष देविदास बाविस्कर, मातंग आघाडीचे आण्णा साहेब साठे,भडगाव शहर अध्यक्ष चंद्रमनी बाविस्कर,कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष ईश्वर बाविस्कर,तालुका सल्लागार युवराज भालेराव,युवा उपाध्यक्ष वाल्मिक लोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमास पिंटू सोनावणे,संजय खैरनार, उमेश खैरे,प्रितम सोनवने, अजय सोनवने,सुशील सोनावणे, विकी भालेराव, भैया बाविस्कर, निम्बा ब्राम्हणे,अजित बाविस्कर, गौतम मोरे,छोटू बाविस्कर, दिलीप बाविस्कर,अनिल अहिरे,सोनू जगताप,आरीफभाई मलिक,हसीमभाई,सुशील सोनावणे, वासीमभाई,धोंडू राखूनडे,राजू फाजगे,पिरा राखूनडे, रवी राखूनडे,मनोज सोनावणे, गोरक भराडी,प्रदीप खैरे,भैया शिरसाठ वाक, समाधान मोरे,बाबाजी पाटील,दिलीप शिरसाठ, भैया शिरसाठ वरखेड, भगवान शिरसाठ,नारायण सरदार, नाना मिस्तरी,भारत धोबी,आनंद साठे,बापू बाविस्कर, गौतम खेडकर, गोपाल खेडकर, आबा ह्यालिंगे, तुषार शिरसाठ,सागर सोनवने,संतोष सैनदाने,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका अध्यक्ष खेडकर यांनी मानले