जळगाव- तालुक्यातील रिधुर येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.भिमराव सखाराम कोळी (वय-३४) रा. रिधुर ता.जि.जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , भिमराव सखाराम कोळी हे शेतकरी असून शेतीचे काम करतात. शेतात नेहमीप्रमाणे शेतात गेले. त्यांनी शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही . पोलीस पाटील प्रमोद निंबा पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.
Trending
- दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
- समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
- शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
- पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
- ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
- पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
- आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
- व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!

