अमळनेर(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक रिता भूपेंद्र बावीस्कर यांची पक्ष बळकटीसाठी, संघटनसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य नागरिकांना पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हा निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून त्याचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार,खासदार फौजिया खान,खासदार सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रिता बाविस्कर या ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक असून त्यांनी ग्रंथालयाची चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात पोहचवण्याच काम केलं आहे.सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

