रिक्षा चालक – मालकांच्या मोर्चाने दणाणले भुसावळ

0

जगन सोनवणेंचा लक्षवेधी मोर्चा

भुसावळ | प्रतिनिधी 

भुसावळातील सर्व रिक्षा चालक मालक यांना आरटीओ विभागामार्फत मेमो दिले जात आहेत. हे मेमो हुकूमशाही व मनमाणी पद्धतीने देऊन दंडाच्या रकमेचा धाक दाखऊन एजंट च्या माध्यमातून व आर टी ओ  विभागातील कर्मचारी यांच्या माध्यमातून दंडाच्या नावाखाली तोडी पाणी करुण व  पैशाची मागणी करुण रिक्षा चालक व मालक यांना त्रास देत आहेत, प्रसंगी रिक्षात बसलेल्या रुग्णाना  रस्त्यावर उतरवून कारवाई केली जाते. यावर आळा बसावा म्हणून राष्ट्रीय रिक्षा चालक मालक संघटनेचे महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात  डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड पासून 150 रिक्षासह मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा हा गांधी पुतळा, लोखंडी पुल,स्टेशन रोड,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,ताजोद्दीन बाबा दर्गा रेल्वे स्टेशन समोर समारोप झाला, या वेळी घोषणा देण्यात आल्या, घोषणांनी शहर दणाणले होते, यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक्र मालक सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, जिल्हा अध्यक्ष संजीव इंगळे, जिवन कोळी,आशीश बढे,साजीद शेख,धनराज लोणारी,राजेश सुर्यवंशी,सुनिल ठाकूर,गणेश भोई,शुभम वैदय,संगीता ब्राम्हणे,मनिष कुळकर्णी, नरेश सोनवणे उपस्थित होते.
|यानंतर 1 जुलै रोजी जळगांव येथिल आरटीओ कार्यालयावर वीस हजार रिक्षा सह मोर्चा काढण्यात येणार असून   मोर्चा चे रुपांतर आमरण उपोषणात करणार असल्याचे जगन सोनवणे यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.