अमळनेर – ही निवडणूक दिल्लीची असून गल्लीची नाही. यादेशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांचे आश्वासन हा कोबड्या विकण्याचा धंदा आहे हा कधी पूर्ण होणार नाही हे केवळ निवडणूक आली की बोलतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमळनेर येथील जाहीर सभेत लगावला.
आ.उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुढे भाषणात बोलताना ते म्हणाले, देशामध्ये ५५ -६० वर्ष आपण एक सरकार पहिली आहे दुराचारी,अनाचारी,अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशी त्या सरकारची संभावना करता येईल अशा प्रकारची राष्टवादी व कॉंग्रेसची सरकारची सरकार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण दीर्घकाळ बघितलं आहे. मोदींच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षात देशामध्ये परिवर्तन झालं आहे. माढाची इनिंग खेळायला निघालेले राष्ट्रवादीचे कप्तान खेळायला तयार नाही मग यांचे चेले चपटे काय लढतील. सध्या मोदींमुळे हे पछाडलेले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रावादीवाले स्वप्नातही मोदी मोदी करीत असतील अशी यांची बिकट अवस्था झाली आहे. कधी अस वाटत यांची भांडण जर एकली असतील तर अर्धा वेळ मोदींना शिव्या देतात व उरलेला अर्धा वेळ हे काय सांगतात हे कुणालाच समजत नाही, अशीही टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार आ.उन्मेष पाटील, आ.शिरीष चौधरी, माजी खासदार एम.के.पाटील, आ.स्मिता वाघ, जिप अध्यक्षा उज्वला पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, अमळनेर नगरपालिकेच्या पुष्पलता पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी सभापती श्याम अहिरे, बाळासाहेब पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे नेते डॉ.पिंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.