राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप

0

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या नागरिकत्वाबाबत भाजपचे नेते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी 2014 मध्ये स्वत:ला ब्रिटिश नागरिक सांगितलं होतं असं राव यांनी सांगितले. यासंदर्भात अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.

जीव्हीएल नरसिम्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यात ते ब्रिटिश नागरिक होते असल्याचं सांगितलं गेलंय. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींकडून जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत त्यातून हे समोर आलेलं आहे. अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. जीव्हीएल नरसिम्हा यांनी यावर आश्चर्य व्यक्त केला. काही अपक्ष उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नाही. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी राहुल हे भारतीय नागरिक आहेत की नाही यावर निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित होत आहे.

राहुल गांधी सन १९८९ मध्ये १२वी उत्तीर्ण झाले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून सन १९९५मध्ये एमफीलची पदवी संपादन केली. ही माहिती राहुल यांनी २००४ मध्ये दिली. मात्र, सन १९९४ मध्ये आपण रोलिन्स कॉलेज ऑफ फ्लोरिडामधून पदवी घेतली, तर १९९५मध्ये डिव्हेलपमेंट इकनॉमिक्समध्ये ट्रिनिटी कॉलेजमधून एमफीलची पदवी मिळवली असे राहुल यांनी सन २००९ मध्ये म्हटल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, सन २०१४ च्या निवडणुकीत आपण डिव्हेलपमेंट स्टडीजमध्ये एमफील केल्याचे राहुल म्हणाले, असे सांगत त्यांनी कोणती पदवी मिळवली हे त्यांना आठवत नाही का, असा सवाल राव यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.