राहुल गांधींनी पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला? काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

0

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधानपदाच्या चर्चांना जोर पकडला आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, पण एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असे आझाद यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असं याआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं. पण आता गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे. विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.