राजस्थान – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका विवाहितेचा तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार करून त्याचे छायाचित्रण करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, आज राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेची भेट घेतली असून यावेळी त्यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश पांडे हे देखील उपस्थित होते. याबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सांगितले की, “मी सदर बलात्कार पीडितेची भेट घेतली असून आम्ही या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत.”