राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त जलचक्र येथे प्रा.हितेश पाटलांकडून महिलांना किराणाचे वाटप

0

बोदवड (प्रतिनीधी) अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवसा निमित्त युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रा.हितेश सुभाषराव पाटील यांच्याकडून तालुक्यातील जलचक्र बुद्रुक व जलचक्र खुर्द येथे गरजू कुटुंबातील महिलांना स्व:खर्चाने मदत करीत साधारणत:महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य वाटप केले.त्यात ५ किलो गहू आटा,१ किलो साखर,१ लिटर तेल,२ किलो तांदूळ व इतर किराणा साहित्यांचा समावेश आहे.

तसेचं प्रा.हितेश पाटील यांनी गरजु कूटुंबाना पुढील सहा महिन्यासाठी ७ हजार ५०० रुपये, तसेच मनरेगा अंतर्गत २०० रुपये दिवसाचा रोजगार तसेच सूक्ष्म,लघु आणी मध्यम उद्योगातील रोजगार वाचविण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात आर्थिक मदत करुन केंद्र सरकारने न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली.

किराणा साहित्य वाटप करतेवेळी जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेस प्रा.हितेश सुभाषराव पाटील,धनराज पाटील,रवी पाटील,गणेश पाटील,बंटी पाटील,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंजाजी पाटील,संदीप पाटील, रंगनाथ गावंडे,विजय सपकाळ, संभाजी साठे,किरण माळी यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.