केरळ :- १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता.
Kerala: Congress President Rahul Gandhi files nomination from Wayanad parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/abn2g9ahQE
— ANI (@ANI) 4 April 2019