लोकशाही न्यूज नेटवर्क
देशाचा विकास हा मुख्यतः युवकांवर अवलंबून असतो. प्रत्येक देशाला युवक समृद्ध बनवत असतो. युवा शक्ती योग्य दिशेने प्रवाहित झाली तरच देश प्रगतीपथावर अग्रेसर होईल. या संकल्पनेची आठवण म्हणून आणि देशाप्रती अभिमानाने देश सेवा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी भारतात 12 जानेवारी या दिवशी म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य म्हणजे एक प्रकारचे तपच म्हणता येईल. यामध्ये त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप चांगल्या प्रकारचे प्रेरक होऊ शकेल. त्याचा प्रत्यय म्हणून प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्यांचे कार्य तरुणांसमोर आणले जाईल अशा प्रकारची भावना राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यामागे असते.
भारतातील एक महान तत्वज्ञान आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची जयंती ही 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास
महान, अध्यात्मिक आणि तत्वज्ञानी नेते स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी देशातील तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने 1984 पासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आहे. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुणांच्या हे खेळापासून हॉलीवुड पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तरुणांचे वर्चस्व आहे. भारतीय राजकारणात हे तरुण पुढे येत आहेत. तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या शक्ती एकवटून आपले सरकार स्थापन केले आहे. तरुण पिढीने त्यांना उघडपणे मतदान केले होते. आज सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर तरुण मंडळी करतात फॅशन ट्रेंड असो की बदलती जीवनशैली या सगळ्याच तरुण पिढीचे वर्चस्व आहे.
विवेकानंद तरुणाईमध्ये लोकप्रिय
स्वामी विवेकांनंद यांचे नाव अशा विद्वानांमध्ये घेतले जाते, ज्यांनी मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानला होता. संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये बंगालमध्ये झाला होता. स्वामी विवेकानंद आपल्या आवेशपूर्ण आणि तर्कावर आधारित भाषणांमुळे लोकप्रिय झाले. विशेष करुन त्यांची भाषणे आणि विचार तरुणांना भावले.
मानवतेच्या सेवेसाठी विवेकानंदानी 1887 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे नाव विवेकानंदानी आपले गुरु रामकृष्ण परमहंस याच्या नावावरुन ठेवले होते. भारतीय तरुणांसाठी स्वामी विवेकांनद यांच्यापेक्षा दुसरा मोठा आदर्श नेता क्वचितच असेल. त्यांनी अमेरिकेतील शिकागोमध्ये 1893 मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते.
स्वामी विवेकानंद यांनी 39 वर्षाचा त्यांच्या अल्प जीवनकाळात त्यांनी जे केलं, त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील. 25 व्या वर्षी त्यांनी भगवे कपडे धारण करत संन्यास घेतला होता. पायी चालून त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं होतं. त्यांनी अनेक देशांनाही भेट दिली होती.
तरुण राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते. आज भारतासमोर अनेक मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांनी विवेकानंदाना प्रेरणास्थानी ठेवून आपल्या देशाप्रती कर्तव्य पार पडणे आजच्या काळाची गरज आहे. जेणेकरून आपला भारत देश अधिकाधिक सक्षम होईल.