नवी दिल्ली:
६५व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रवी जाधव दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू‘ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर, ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे याला ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं आहे. समीक्षकांनी नावाजलेला व ‘ऑस्कर’ची दारं ठोठावणारा राजकुमार राव अभिनित ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.