आमदार किशोर पाटील यांचे उपस्थितीत झाला कार्यक्रम
पाचोरा –
राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात दारीद्ररेषेखालील कुटुंब प्रमुखाचे निधन झाले त्यांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप-आमदार किशोर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी तहसिलदार बी. ए. कापसे, निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रा.गणेश पाटील, अॅड. दिनकर देवरे, चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, भरत खंडेलवाल, संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन भाऊसाहेब नेटके, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या अव्वल कारकुन रेखा साळुंखे,सिमा पाटील, अर्जुन इंगळे, हेमंत जडे उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यातील ३१ मयताचे वारसांना प्रत्येकी विस हजार रुपये धनादेश, रंजनाबाई लालसिंग पाटील (सातगांव), प्रमिला घनराज पाटील (कुरंगी), मंडाबाई अर्जुन सिरसाठ (मोहाडी), ज्योती निळकंठ महाले(नगरदेवळा), रत्नाबाई लक्शीमन राजगौड व लिनाबाई शेनपडू रगडे(पाचोरा), चित्रकलाबाई ज्ञानेश्वर पाटील (घुसर्डी बु”), नुरबाई भिकन तडवी (पिंपळगाव हरे) कल्पना बळीराम कोळी(दहिगांव), छायाबाई शरद पाटील (मोंढाळे), लिलाबाई अरूण ऊबाळे (भोजे), मंगलाबाई समाधान सोनवणे (दहिगांव), कल्पना सुरेश पाटील (पाचोरा), सरुबाई ज्ञानेश्वर माळी (नगरदेवळा), प्रमिलाबाई छोटू पाटील (नगरदेवळा), कल्पना रोहिदास पाटील (गाळण बु”), छाबाबाई चांदखा तडवी (कोल्हे), विजयाबाई मोहनसिंग पाटील व रंजना गौतम अहिरे (वडगांव मुलाने), प्रमिला धोंडी तेली (खडकदेवळा खुर्द), हाकीबाई ताराचंद राठोड (विष्णूनगर), हिराबाई आनंदा महाले (पिंपळगाव), छायाबाई भारत कोकणे(बांबरुड राणीचे), लताबाई शहादू भोई(नगरदेवळा), संगीता प्रकाश ठाकूर व मनिषा हनुमान ढगे(पाचोरा), लक्षीमीबाई नाना पाटील (अटलगव्हाण), आशाबाई वसंत इंगळे (पाचोरा), मंगलाबाई संजय सावकारे (शिंदाड) व सोनूबाई काशिनाथ जावरे (पिंपळगाव खुर्द) या वारसांना घनादेशाचे वाटप करण्यात आले.