राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कल्पना पाटील व मिनल पाटील यांच्याकडून मदतीचा हात

0

जळगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आला असून या काळात हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गोर गरीब आणि रोजंदारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी अनेकांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सर्वसामान्य गरजू 200 गरीब कुटुंबांना किराणा मालाची मदत व्हावी म्हणून 5 किलो आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो तुरडाळ, 1 किलो तेल अशा वस्तूंचं पॅकेज करून वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. जेणेकरून काही कुटुंबांना याचा लाभ होईल.

राज्य सरकार आपल्या पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात मदत करत आहेत पण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सर्वसामान्य जनतेसाठी आपलं काहीतरी कर्तव्य असल्याचं मत महिला जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई पाटील व कार्याध्यक्षा सौ.मीनल पाटील यांनी मांडलं.   या वेली जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अभिषेक पाटील यांच्या पत्नी सौ. अरुंधती पाटील तसेच लहानगी मुलगी समर्था आणि समर्थ यांनी ही मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.