राष्ट्रवादी पक्षातर्फे ईडीची चौकशीचा निषेध

0

जळगाव। प्रतिनिधी
शहरात आज राष्ट्रवादी पक्षातर्फे कार्यालयासमोर ईडीची चौकशीचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी लावल्याचा निषेध म्हणून आज पक्षातर्फे कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या आंदोलनप्रसंगी ईडी झाली येडी…मोदी सरकार हाय-हाय! याच्यासह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस अशोक पाटील, अजय बढे, रोहित सोनवणे, दिलीप महेश्वरी, राजेश गोयर, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, बंडू भोळे, ममता तडवी, कुणाल बागुल, अरुण खैरनार, धनराज मराठे, पवन हटकर, किशोर शिंपी, विशाल देशमुख, गणेश शिरसाठ, सूरज बिऱ्हाडे, भैय्या पाटील, विकी पाटील, जावेद भाई जे. के. ग्रूप इंडिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.