भुसावळ-
मुंबई येथील राष्ट्रवादी कॉग्रेस भवनात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारणीच्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष,तालुकाध्यक्षांची आढावा बैठक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयदेव गायकवाड यांचे उपस्थितीत झाली. सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख आ. जयदेव गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत गायकवाड यांच्या कार्याचे कौतूक केले.यावेळी जयवंत पाटील हे पुढे बोलतांना म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरोगामी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारावर चालणारी पार्टी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सर्व पदाधिकार्यांनी गाव खेड्यात जावून खाली चटई वर बसून, गोर गरीबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान हे आमचे आदर्श आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख जयदेव गायकवाड , हेंमत टकले, आ.जितेंद्र आव्हाड,आ. प्रकाश गजबे, सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडीत कांबळे, तसेच जळगांव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी व संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.