जळगाव, दि.20 –
राज्यात एप्रिल महिन्यात होणार्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वात्रिक निवडणूकीसाठी स्ट्रार प्रचारक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र नुकतेच गुलाबराव देवकर यांना मिळाले आहे.
एप्रिल महिन्यात जामनेर, वैजापूर नगरपरिषद व गुहागार, देवरूख, कणकवली, आजरा या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने एकूण चाळीस स्टार प्रचारकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हयातून गुलाबराव देवकर यांच्या समावेश आहे. या स्ट्रार प्रचारकांची नावे पक्षाच्या वतीने राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या कडे पाठविण्यात आली आहे .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.