राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अविनाश भोइर यांनी घेतले आदिवासी मुलीला दत्तक

0

मुरबाड,  प्रतिनिधी – सुभाष जाधव

 

गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना आज सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एका आदिवासी मुलींना दत्तक घेऊन अविनाश भोईर यांनी समाजासमोर  एक आदर्श निर्माण केला आहे .

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील सदु ची वाडी खाटेघर येथील बाळकृष्ण वाघ यांची मुलगी सिया ही जिल्हा परिषद शाळा भवन येथील इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे व तिचा इतर संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अविनाशजी भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तसेच मुरबाड तालुक्यातील पत्रकारांचा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरबाड शहराध्यक्ष दीपक वाघचौरे ,विलास जाधव व इतर मंडळी उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.