राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महानगर तर्फे आयोजित जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

 जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे आजपासुन दररोज सकाळी 11 ते 1 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष श्री. अशोक लाडवंजारी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे . सदर जनता दरबारात नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडाव्यात असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले होते .

त्याअनुषंगाने आज रोजी सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 पासुन नागरिकांनि राष्ट्रवादी कार्यालयात येऊन आपल्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्यात यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांना सुविधा मिळत नसलेबाबत व इतरही विषयी समस्या मांडण्यात आल्यात त्यानुसार  तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले .

तसेच ईच्छादेवी चौकात सर्कलचे काम सुरू असुन त्या सर्कलला ईतर कुठलेही नाव देऊ नये फक्त ईच्छा देवी चौक याच नावाने हा सर्कल ओळखला जावा यासाठी ईच्छादेवी परिसरातील नागरिकांसोबत आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले . यासह तहसील कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय कार्यालयातील समस्या नागरिकांनि मांडल्या आहेत  .

या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील याविषयी संबंधित नागरिकांना आश्वास्त करण्यात आलेले आहे . तसेच सदर जनता दरबारात नागरिकांनी यापुढेही त्यांच्या समस्या मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरतर्फे करण्यात आलेले आहे . याप्रसंगी एजाजभाई मलिक , डॉ. रिजवान खाटिक , अमोल कोल्हे , सुनील माळी भगवान सोनवणे , सुशील शिंदे , विशाल देशमुख , सुहास चौधरी आदि उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.