राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी नगर घरकुल परिसरात लसीकरण मोहीम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव महानगर तर्फे छत्रपती शिवाजी नगर येथील हुडको परिसरात जिल्हा महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त जिल्हा महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी कोविड 19 लसीकरण कँपचे आयोजन केलेले होते.

सदर कँपमध्ये सुमारे 250 युवक व युवतींचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुनीलभाऊ माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुशील शिंदे, सुहास चौधरी, शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल, विनायक पाटिल उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महानगरपालिकेतर्फे GNM उर्मिला भिरुड, ANM सुरेखा मेढे, डाटा ऑपरेटर भूमिका चौधरी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संतोष पवार विठ्ठल महाजन, रवी कोंडाळकर, बाळा फाळके, अनिल पेंढारकर, पिंटू कोळी आदिंनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.