राष्ट्रवादीत प्रवेश बाबतच्या चर्चांना खडसेंकडून पूर्णविराम ; म्हणाले

0

जळगाव : भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र, आता खडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा निराधार असून, यात कुठलेही तथ्य नाही, असे खडसे यांनी सांगितले

नाराज एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यातूनच एकनाथ खडसे भाजपला रामराम करत  राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे.  मागील आठवड्यात ‘जनसेवेचा मानबिंदू-एकनाथराव खडसे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती. दोन-तीन दिवस सलग आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर खडसे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय रंगल्या होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.