राष्ट्रवादीतील गळती सुरूच ; आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा

0

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार रामराव वडकुते यांनी आज (14 ऑक्टोबर) राजीनामा दिला आहे. वडकुते यांनी विधानपरिषद सभापतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. रामराव वडकुते उद्या (15 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे वडकुते यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर ते लवकरच भाजपत जाणाार असल्याच्या चर्चा रंगल्या (Ramrao Wadkute resign) होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.