Saturday, October 1, 2022

राष्ट्रवादीतर्फे “युवक जोडो”व संपर्क अभियानाचा अमळनेरात शुभारंभ

- Advertisement -

अमळनेर (प्रतिनिधी):- यापुढील काळ हा तरुणांचा असून येत्या काळात मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत युवकांनाच प्राधान्य दिले जाईल अशी भावना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “युवक जोडो” व संपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली.

- Advertisement -

आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित ‘युवक जोडो व संपर्क अभियानाची आढावा बैठक अमळनेर येथे पार पडुन या बैठकीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असून पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरात विविध तालुक्यात हे अनोखं अभियान राबवण्यात येत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या अभियानाचा मूळ उद्देश म्हणजे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहचावं व जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी एकरूप करणं हे असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले. तसेच ‘वन बूथ टेन युथ’ या संकल्पनेवर जास्तीत जास्त भर देण्याचं आवाहन करत लवकरात लवकर तालुका युवक पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या तयार करून कार्यकारिणी जिल्ह्याकडे सुपूर्द कराव्या यासोबतच युवकांनी आता यापुढील काळात आक्रमकरित्या आपली वाटचाल ठेवून निवडणूका लढवाव्यात असंही मत व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी पक्षवाढीसाठी बूथ कमिट्या बळकट करून एकजुटीने लोकहितासाठी उभं राहण्याचे आवाहन केले.

सदर बैठकीला जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक राज कोळी, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, युवक जिल्हा सरचिटणीस निनाद शिसोदे, गोविंदा बावस्कर, पंकज पाटील, प्रदीप पाटील, शुभम पाटील, अमोल पाटील तसेच अमळनेर तालुक्यातील व शहरातील सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष  विनोद विश्वास सोनवणे व शहराध्यक्ष निलेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हे आहेत नव नियुक्त पदाधिकारी- 

शिरीष पांडुरंग पाटील, प्रशांत रमेश पाटील व शरद रामचंद्र पाटील ता.उपाध्यक्ष रा.यु.कॉ, प्रणव सुनिल पाटील ता.कार्याध्यक्ष- रा.यु.कॉ, चिंधा लखीचंद मालचे ता.सचिव- रा.यु.कॉ, मयूर अनिल पाटील ता.सचिव- रा.यु.कॉ, भूषण रघुनाथ पाटील व गोविंदा मच्छिन्द्र सोनवणे ता.सरचिटणीस- रा.यु.काँ.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या