चाळीसगाव (प्रतिनिधी) :– येथे ट्रामा केअर सेंटरला सुरू होत असलेल्या कोविड सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दि.६ ऑगस्ट रोजी आर.ओ.फिल्टर प्लांट सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रांत लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, सिव्हील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डाँ.
बी पी बाविस्कर सर, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जिल्हापरिषद गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, नगरसेवक दीपक पाटील, चितेगावचे सरपंच अमोल भोसले, कुशल देशमुख, धनंजय देशमुख, प्रताप भोसले, प्रकाश पाटील, राजेंद्र मोरे, कौस्तुभ राजपूत, भागवत पाटील, युवक उपाध्यक्ष शुभम पवार, गुंजन मोटे, राकेश राखुंडे आदी उपस्थित होते.