Wednesday, August 17, 2022

राष्ट्रवादीतर्फे आदीवासी मुंलांना पौष्टीक वाटप

- Advertisement -

यावल | प्रतिनिधी 

- Advertisement -

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सक्षम नेतृत्व कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदीवासी मुलामुलींना पौष्टीक आहार वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार असे सक्षम नेतृत्व करणारे महाविकास आघाडीतील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता शहराला लागुन असलेल्या गोळीबार टेकळी या आदीवासी वस्ती पाडयावरील लहान मुला मुलींना पौष्टिक आहार व खाऊचे वाटप करण्यात आलीत . याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  कार्यक्रमास उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदविला यावल येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम .बी . तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे ,यावल शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, भालोद चे राहुल चौधरी , बापु जासुद, हेमंत येवले , अब्दुल सईद शेख रशीद ,गनी भाई , दिनुनाना पाटील. पवन धोबी , आरीफ खान , विरेन्द्रसिंग राणा , अशोक भालेराव , दिपक तडवी , विजय साळी , नाना कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते  तर पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम  घेतले .

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या