राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

मुक्ताईनगर । राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी आज सकाळी कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेतच्या मतदान केंद्रावरती मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी हक्काचा माणूस निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले.

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षावर होत नसते पक्षाच्या विचाराचे लोक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहोत, मतदाराने मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्ये नव्याने दाखल झालेल्या रोहिणी खडसे यांनी आज दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.