ठाणे | प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शाहापूरमध्ये घडली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवीशेठ पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रवीशेठ पाटील हे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घरी जात असताना त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात रवीशेठ पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
रवीशेठ पाटील हे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. गाडी जवळ पोहोचताच गाडीचा टायर पंक्चर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. गाडीचा टायर हल्लेखोरांनीच पंक्चर केला असल्याचं सांगितलं जात आहे. रवीशेठ पाटील हे टायर बघण्यासाठी खाली वाकले, तेव्हा सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने रवीशेठ पाटील यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत रवीशेठ पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.