जळगाव :- राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वाढत्या बेरोजगारीविरोधात आज थाळीनाद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
नोटाबंदीमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले असून अनेक छोटे-मोठे उद्योग देशोधडीला गेले आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातील शासनाच्या १९ कंपन्या बंद झाल्या असून राज्यातील अनेक छोटे मोठे उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडून सुमारे ३० लाखाहून अधिक लोकं बेरोजगार झाले आहे, प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्ग हैराण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करून सरकारच्या विरोधात थाळीनाद आंदोलन काढले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे यांनी केले. यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलिक, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ते मा.योगेशजी देसले, प्रदेश सरचिटणीस सत्यजित शिसोदे, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील, ग्रामीणचे अध्यक्ष ललितजी बागूल आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.